Breaking News

कुडासे खुर्द गावाने घेतला स्वच्छतेचा वसा

सिंधुदुर्गनगरी, दि. 20, फेब्रुवारी - दोडामार्ग तालुक्यात कुडासे खुर्द गावाने स्वच्छतेचा वसा घेतला आहे. स्वच्छतेची चळवळ केवळ ग्रामपंचायतीपूर्ती सिमीत न ठेवता त्या चळवळीत त्यांनी स्वच्छतादूत म्हणून 35 शाळकरी मुलांसह तरुण-तरुणी आणि वृद्धांनाही सहभागी करून घेतले आहे. ओल्या आणि सुक्या कचर्‍यासह प्लास्टिक कचर्‍याचेही व्यवस्थापन त्यांनी नियोजनबद्धरीत्या सुरु केले आहे आणि कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायती शेजारी चक्क निर्मल बँक उघडली आहे.


तिलारी धरणामुळे विस्थापित झालेल्या पाल ग्रामस्वच्छ्ता अभियान, स्मार्ट ग्राम,. स्वच्छतेचा विशेष जिल्हास्तरीय पुरस्कार असे अनेकविध पुरस्कार या ग्रामपंचायतीने मिळवले आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि गावकरी मिळून ग्रामविकासासाठी झटतात. त्यामुळे स्थापनेपासून तीन साडेतीन वर्षातच ग्रामपंचायतीने अनेक पुरस्कार आणि सन्मान पटकावले.