Breaking News

नाधवडे धरणाजवळ पट्टेरी वाघाचे दर्शन केवळ अफवाच !

सिंधुदुर्गनगरी, दि. 20, फेब्रुवारी - वैभववाडी तालुक्यात नाधवडे धरणाजवळ पट्टेरी वाघाच्या दर्शनाची छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅपवर फिरू लागताच कुतूहल तर निर्माण झालेच. परंतु वनविभागासह परिसरातील नागरिकांची तारांबळही उडाली. मात्र, वनविभागाने त्याबाबत खात्री केल्यानंतर ती अफवा असल्याचे स्पष्ट होताच सा- यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.


व्हॉट्सअ‍ॅपवर मध्यरात्रीपासून तळेरे-वैभववाडी-कोल्हापूर मार्गावर नाधवडे धरणासमोर पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची 4 छायाचित्रे जोरात फिरवली जात होती. त्यामुळे दिवस उजाडताच वाघाच्या चर्चेने धुमाकूळ माजवला. ओळखी पाळखीचा प्रत्येकजण ती छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करीत होता. ’तळेरे वैभववाडी मार्गावर रात्री 11.15 वा. वाघ दिसला. प्रवाशांनी खबरदारी घ्या’ हा मेसेजही छायाचित्रांसोबत येत होते. त्यामुळे काहीसे कुतूहल आणि भीतीही पसरली होती. मात्र, छायाचित्रे काढणा-याचा मोबाईल नंबर अनेक ांना विचारूनही दुपारपर्यंत तो कोणीच देऊ शकला नाही. त्यावरून ती अफवा असल्याची जाणीव झाली होती.