Breaking News

समृध्द सिंधुदुर्ग बनविण्याचा संकल्प करुया - दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी, दि. 20, फेब्रुवारी - छत्रपती शिवरायांच्या विचाराचा, पराक्रमाचा, समाज उत्कृर्षाचा वाटचालीचा मागोवा घेत आपण दैनंदिन जीवनात वारसा जपूया. छत्रपती शिवरायांच्या सामाजिक सलोखाचा आदर्श जोपासत विकासासाठी एकत्रित येवून समृध्द सिंधुदुर्ग बनविण्याचा आज आपण संकल्प करुया असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गनगरीत शिवजयंती उत्सवात आयोजित कार्यक्रमात केले.


सिंधुदुर्गनगरीतील ओरोस तिठ्यावर आयोजित शासकीय शिवजयंती कार्यक्रमात येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती अश्‍वारुढ पुतळ्यास पालकमंत्री केसरकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.