Breaking News

गाड्या भंगारात विकून विमा कंपन्यांना गंडा

सातारा, दि. 20, फेब्रुवारी - पासिंग न झालेली नवी वाहने भंगारात विकून वाहन चोरी झाल्याची फिर्याद देणा- या गोडोलीतल्या महाठगासह कोल्हापूरच्या तीन भंगार व्यावसा यिकांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून एक्सयूव्ही 500 व ट्रक अशी दोन वाहनांसह साडे ते वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


अतुल सुभाषचंद्र साळुंखे (वय 33, रा. त्रिमूर्ती कॉलनी सातारा) हा मूळ फिर्यादी असून वाहन विमा मिळवणे व नवी वाहने भंगारात विकणे या कृत्याबद्दल त्यांच्यावरच गुन्हा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीर इब्राहिम हारचीकर (वय 40 जवाहरनगर सिरत मौहल्ला कोल्हापूर) आसिफ रफिक पठाण (वय 29, रा. राजोपाध्ये नगरी करवीर नगरी) अन्वर दाऊद कच्छी (वय 56 रा विश्‍वकर्मा कॉलनी संभाजी नगर कोल्हापूर) या भंगार व्यावसायिकांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार स्था गु. शाखेचे उपनिरीक्षक व शशिकांत मुसळे यांना महामार्गावर शिवराज तिकाटणे येथे दोघेजण वाहन विक्री करण्यासाठी आल्याची माहिती होती. साळुंखे व अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. इचलकरंजी गोवा सातारा येथे वाहन चोरी झाल्याची खोटी फिर्याद देऊन तब्बल पाच वाहनांची परस्पर भंगारात विक्री करुन विम्याचे पैसे विमा कंपनीकडून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

ट्रक मालकानेच विकला भंगारात ट्रक 
चोरांची ही मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले ट्रक मालक हाच स्वतःचा ट्रक घेऊन कोल्हापूरला निघाल्याचे पोलिसांनी सांगितले. नव्या गाडीचे स्पेअर विकून बाकी गाडी भंगारात देण्याचे नियोजन आखण्यात आले होते. स्था गु. शाखेच्या पथकाने ट्रक व जीप ताब्यात घेतली आहे. चौगुले याने नक्की किती फायदा लाटला याचा शोध घेतला जात होता. या चोरीचे कनेक्शन कोल्हापूर असल्याचे लक्षात आल्यावर तीन भंगार व्यावसायिकांना अटक करण्यात आली. इस्लामपूर ( सांगली) म्हापसा (गोवा) व सातारा तालुका येथेेे वाहन चोरीच्या खोट्या तक्रारी दिल्या आहेत. एका वाहनाच्या विम्याची रक्कमही चौगुले याने हडपल्या हेे स्पष्ट झाले आहे .

खोट्या तक्रारी करणा-यांवर कारवाई 
अतिरिकत पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी खोट्या तक्रारी करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिली आहेत. सातारा शहर परिसरातील भंगार व्यावसायिकांच्या सविस्तर नोंदी करून त्यांची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले.जप्त करण्यात आलेला ट्रक साता-यातून चोरीला गेल्याची कबुली अतुल साळुंखे याने दिली. त्यासाठी त्याचे लोकल क नेक्शन तपासण्याची मागणी होत आहे.