Breaking News

एकात्मिक बालविकास सेवा योजना उत्साहात


आश्वी : प्रतिनिधी ;- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे संगमनेर पंचायत समितीच्यावतीने आयोजित एकात्मिक बालविकास सेवा योजना उत्साहात राबविण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना आरोग्य, कुटुंबनियोजन व कायदेविषयक मार्गदर्शन आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या विधीज्ञ रोहिनी निघुते होत्या. सभापती निशाताई कोकणे, अँड. श्रीमती मालपाणी, आहारतज्ञ श्रीमती उत्तारसे, वैशाली कुकडे, पंचायत समिती सदस्या दिपाली डेंगळे, बेबी थोरात, श्रीमती जोर्वेकर, प्रकल्प अधिकारी शिंदे, भाऊ गायकवाड, अशोक म्हसे, ज्ञानेश्वर वाकचौरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.