स्व. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पैठण प्रतिनिधी ;- पैठण तालुक्यातील सर्व पक्षीय,सामाजिक संघटना , नागरीक व वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने आज दि.२६ रोजी सकाळी 10 वाजता भारताचे माजी केंद्रीय मंत्री पैठण तालुक्याचे सुपुत्र जायकवाडी धरणाचे जनक स्व.शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर उद्यानमधील त्यांच्या पुर्णाकृती पूतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या आठवणीनां उजाळा देताना आपेगाव संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापुरकर यांनी स्व. शंकरराव चव्हाण यांनी श्री क्षेत्र आपेगावसाठी केलेले काम फार मोलाचे होते त्यामुळे त्यांना वारकरी सांप्रदाय कधीच विसरणार नाही तर मान्यवरांनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आठवणरूपी आढावा घेवुन पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन कार्यक्रम पार पाडला. शासनाकडून संत ज्ञानेश्वर उद्यान व पूतळा परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली तसेच पुण्यतिथी निमित्त धरणात जल पुजन करण्यात आले.
