Breaking News

कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा यांना एक्सलन्स पुरस्कार

राहुरी ता. प्रतिनिधी  ;- पुणे येथे ‘इंडियन फ्लावर अ‍ॅण्ड प्लँट इंडस्ट्री एक्सलन्स’ आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्‍वनाथा यांना आयफ्लोरा एक्सलन्स पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी वाफीसिल्फा एन्टरटेनमेंटचे संचालक तलिस रिझवी आणि मिडीया टुडे समुहाचे कार्यकारी संचालक एम. बी. नकवी उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांना हरित उद्योग प्रदर्शनात जागतिक पुष्पोत्पादनात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. विश्‍वनाथा यांनी बंगळूर येथील कृषी विज्ञान विद्यापीठातून पीएच. डी. प्राप्त केली आहे. तामिळनाडू येथील अन्नमलाई विद्यापीठातून बौद्धिक मालमत्ता हक्क विषयात त्यांनी पीएच. डी. मिळवली आहे. या पुरस्काराबद्दल राहुरी विद्यापीठ परिसरातून डॉ. विश्वनाथा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.