Breaking News

सागरी महामार्गावरील अपघातस्थळांचे सर्वेक्षण करा - खा. विनायक राऊत

सिंधुदुर्गनगरी, दि. 01, फेब्रुवारी - सागरी महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, या सागरी महामार्गावरील मालवण ते शिरोडा दरम्यानच्या अपघात स्थळांचे सर्वेक्षण करावे अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी रस्ते सुरक्षा बैठकीत केली. खा. विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली.


जिल्ह्यामध्ये महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर सुरक्षेविषयी सूचना तसेच रेडीयम लावणे व वळणांची माहिती देणारे फलक असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वाहतूक शाखेने आठवड्यातून एकदा महामार्गाचे सर्वेक्षण करावे व अशा फलकांची आणि सूचनांची गरज असलेल्या ठिकाणांची यादी समितीला सादर करावी अशा सूचनाही राऊत यांनी यावेळी दिल्या. हेल्मेट व सीट बेल्ट वापराविषयी जास्तीत जास्त प्रबोधण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.