Breaking News

खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासाठी महापालिकेतर्फे मदत केंद्र सुरू

नवी मुंबई, दि. 01, फेब्रुवारी - दुर्बल घटकांसह अन्य संवर्गातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी महापालिकेतर्फे मदत केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका शिक्षणाधिकारी संदिप संगवे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 


या प्रक्रियेत ज्या शाळांची फी काही लाखांच्या घरात आहे, अशा प्रतिष्ठीत शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळतो, अर्थात त्या विद्यार्थ्यांची पूर्ण फि माफ केली जात आहे, त्याला शाळेत प्रवेश घेतल्यापासून अगदी 10 वी पर्यंत पूर्णपणे मोफत शिकविले जाते. 


बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 12(1) नुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये पालकांना ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. हा प्रवेश अर्ज भरण्यास समस्या आल्यास त्या सोडविण्यासाङ्गी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने 11 ठिकाणी मदत केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती संगवे यांनी दिली. सीबीएसई, महाराष्ट्र राज्य बोर्ड, आसीएसई यासर्व बोर्डांच्या आरटीई अंतर्गत नोंदणी झालेल्या शाळांनी वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे.