दिल्लीत ढोंग गल्लीत सोंगःमहापुरूषांच्या नित्य अवमानाची साक्ष
कथनी आणि करनीतील फरक समजून घेण्यासाठी पंचतंञातील बोधकथा किंवा रामायण महाभारतातील उदाहरणे द्यायची गरज नाही.भगूर परिसरात फेरफटका मारल्यानंतर हा फरक चटकन नजरेत भरतो.महापुरूषांच्या नावावर राजकारण करणारा सत्ताधारी पक्ष राज्य किंवा राष्ट्रिय पातळीवर महापुरूषांची स्मारके,त्यांच्या नावाने अनेकविध योजनांची घोषणा करू न सत्ताधारी अनुयायांना खुश करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात.या स्मारकांची अवस्था आणि योजनांची परिस्थिती कशी दयनीय होते हे आजवर सर्वश्रूत आहे,या पलिकडे जाऊन गावोगाव महापुरूषांच्या नावावर अस्तित्वात असलेल्या स्थानांची अवस्था दयनियतेच्या पलिकडे जाऊन महापुरूषांच्या नित्य अवमानास कारणीभूत ठरत आहे.स्वा.सावरक रांच्या जन्मभूमीत छञपती शिवाजी महाराजांच्या नावावर असलेल्या चौकात डा.बाबासाहेब आंबेडकर डेली मार्केटची दुरावस्था या नित्य अवमानाची साक्ष काढीत आहे.यंञणेची निंदनीय अकार्यक्षमता या महापुरूषांचा एकाच वेळी नित्य अवमान करण्यास कारणीभूत ठरल्याने भगूर वासियांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भगुर येथील डॉ. आंबेडकर डेली मार्केटची अतीशय दुरावस्था झालेली असून भगुरच्या या सौंदर्यात भर घालणा-या मार्केटला अनेक वर्षांच्या अवकळेने पछाडले आहे. छञपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या डॉ. आंबेडकर डेली मार्केट हे समस्यांचे आगार बनले आहे.
एक बाजूला महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांनी डॉ. आंबेडकर-यांच्या 125 व्या जयंती निमित्त लंडन येथील डॉ. आंबेडकरांचे घर ताब्यात घेऊन राष्ट्रीय स्मारक म्हणून लोकार्पन केले. तसेच मुंबई येथील इंदु मिलची 12.5 एकर जमीन राष्ट्रीय स्मारक म्हणून व 125 व्या जयंती निमित्त हे वर्ष जन्म शताब्दी व सामाजिक न्याय वर्ष म्हणुन जाहिर केले होते व ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे स्पर्ष झाला असेल किंवा बाबासाहेबांच्या नांवाने एखादे ठिकाण असेल अशा ठिकाणचा विकास व सुशोभिकरण करुन निधी प्राप्त करुन दिला होता व आहे. परंतू भगुर येथील भनपा प्रशासनाने या मार्केटकडे पुर्णपणे डोळे झाक व दुर्लक्ष केले आहे. असा प्रश्न येथील दलीत जनतेला पडलेला आहे.
भगुर नगर पालिकेने काही वर्षापुर्वी लाखो रुपये खर्च करुन मा. रामदास आठवले साहेब यांचे हस्ते उद्घाटन करुन सर्व सुखसोई युक्त हे डेली मार्केट लोकांना खुले करुन दिले आहे. तसेच या डेली मार्केट मध्ये दैनंदिन भाजी पाला विकणारे विक्रेते या ठिकाणी बसुन नसुन, शिवाजी चौक व गवळी वाडा रोड या रस्त्यावर बसुल आपला व्यवसाय करीत आहे. नाईलाजाने येथुन येणा-या जाणा-या नागरीकांना वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागते. यावरुन अनेक भाजी विक्रेत्यांची व वाहन चालकांची चकमक झालेली आहे. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणुन डॉ. आंबेडकर डेली मार्केट हे बांधुन पुर्ण केले होते. परंतू या मार्केटकडे प्रशासन व सत्ताधारी यांनी पुर्णपणे डोळे झाक केलेली आहे. या मार्केटची देखभाल होत नसल्याने येथील फरशा, ओटे तुटलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची टाकी व नळ नाही. बाबासाहेबांच्या नावाचा बोर्ड होता तो देखील पुर्णपणे पुसुन गेलेला आहे. तसेच मार्केट मधील ओटे सुद्धा तुटलेले आहे.मार्केटच्या बाजुलाच दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. या ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपी व टवाळखोर व भिका- यांचा वावर वाढला आहे. येथे वेळोवेळी साफ सफाई होत नाही. येथील पथदीप बंद पडलेलेले असतात. तरी या गंभीर समस्यांकडे भगुर नगर पालिका लक्ष देणार आहे की नाही असा प्रश्न नागरीकानी व कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या डेली मार्केट विषयी वेळोवेळी स्थानिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाला तक्रार करुनही अपेक्षीत कारवाई होत नसल्याचे दिसुन येत आहे. एकीकडे महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन सर्व सुख सोई युक्त असे स्थळ विकसित केले. तरी या संपुर्ण समस्यांबाबत योग्य क ार्यवाही व्हावी. अशी मागणी भगुर मधील युवा कार्यकर्ते - विशाल साळवे, नितीन साळवे, प्रथमेश शाहु, रोशन झनकर, आनंत झनकर, नितीन भालेराव, संदिप चंद्रमोरे, श्रावण निकम, बाळा साहेब चंद्रमोरे, सागर चंद्रमोरे, मनोज जगताप, तेजस गवारे, विराज साळवे, नवीन बल्लाळ, प्रशांत साळवे, आदि कार्यकर्ते व नागरीकांनी केली आहे.