दुसरबीड येथील साखर कारखाना सुरु करण्यासाठी साखर कामगारांच्या सभेत संकल्प
सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे प्रांगणात ईपीएस-95 संघटनेच्या वतीने शुक्रवारी एका सभेचे आयोेजन करण्यात आले होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शेकडो कामगार उपस्थित होते. सभेला प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीचे समन्वयक सुभाष पोखरकर, सेवानिवृत्त महाव्यवस्थापक अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोेले जि.अहमदनगर यांचे देखील मार्गदर्शन लाभले.
यावेळी बोलतांना पोखरकर म्हणाले की, साखर कारखाना सुरु होणे हे केवळ कामगारांसाठीच नव्हे तर ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, वाहतूक उद्योग व परिसरातील सर्व छोटे मोठे उद्योग यांना लाभदायक होणार आहे. एक सुव्यवस्थित चालणारा साखर कारखाना संपूर्ण पंचक्रोशीचा विकास घडवितो. मात्र कामगारांनी अर्धपोटी राहून काम करण्याची तयारी ठेवायला हवी.
कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेली ईपीएस संघटना ही याबाबतीत पुढाकार घेऊन सर्व संबंधित संस्थांचा समन्वय घडविण्याचे काम करेल. यामध्ये जिल्हा सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, राज्य सरकार, बुलडाणा अर्बन व इतर कर्जदार तसेच कामगार पतिनिधी या सर्वांना विश्वासात घेऊन पुढील योजना ठरविण्यात येईल. याशिवाय जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी संघटनेद्वारा विनंती पत्र देऊन त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करण्यात येईल, असे कमांडर अशोक राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले. या संपूर्ण योजनेसाठी सहकार क्षेत्रात वरिष्ठ पदांवर काम केलेल्या डॉ.अशोक खरात यांचे सारख्या महाराष्ट्रातील तज्ञांची सल्लागार समिती नेमण्यात येईल, असेही ते म्हणाले.
या सभेला ईपीएस 95 संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक विरेंद्रजी सिंग, राष्ट्रीय सल्लागार पी.एन.पाटील, कामगार कृती समितीचे गुलाबराव राठोड, राजीव देशमुख, पवार, बी.एम.कायंदे, जे.जे.गरकल, लहाने, हिम्मतराव देशमुख, अशोकराव देशमुख, ए.सी.पठाण, पी.आर.गवई, एस.व्ही.गवई, बी.बी.चौधरी यांच्यासह असंख्य पेशनर्स उपस्थित होते. सभेचे संचालन शेख मनार यांनी तर आभार प्रदर्शन गवई यांनी मानले.