नागपुरात गोदामाला आग, 60 हजार क्विंटल धान्य नष्ट
नागपूर, - नागपुरातील कळमना परिसरातील 4 माळ्यांच्या धान्य गोदामाला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. यात सुमारे 60 हजार क्विंटल धान्य भस्मसात झाले. तसेच आगीमुळे इमारतीचे दोन मजले कोसळलेत. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार कळमना परिसरातील कामठी मार्गावर कॅलिप्सो अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड नामक हे वेअर हाऊस आहे. याठिकाणी पूर्वी हिमालय नामक कोल्ड स्टोअरेज होते. इथे वेळोवेळी आगीच्या घटना घडत असल्याने अग्निशमन दलाने 2 वर्षापूर्वीच वीज व पाणी पुरवठा बंद करण्याची नोटीस बजावली होती. नंतर हे कोल्ड स्टोअरेज बंद पडले. त्यानंतर रामन्नाराव बोला नामक इसमाने ते विकत घेतले. रामन्ना याने कोल्ड स्टोरेज बंद करून तेथे कॅलिप्सो अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड नावाने गोदाम सुरू केले.
शनिवारी पहाटेच्या 3 वाजेच्या सुमारास गोदामातून धूर आणि आगीचे लोळ बाहेर पडताना पाहून तेथील चौकीदाराने मालकाला, पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तेथे धावले. तोपर्यंत आगीने रौद्र रुप घेतले होते. आग विझविण्यासाठी अडचण येत असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या साह्याने एका भिंतीला छिद्र पाडून आतमध्ये पाण्याचा मारा केला.
अग्निशमन दलाच्या 30 जवानांनी 10 बंबाच्या साह्याने अविरत 12 तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान या आगीमुळे प्रचंड उष्णता निर्माण होऊन इमारतीची पडझड होऊन भींत आणि छताचा काही भाग कोसळला. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून यात तूर, गव्ही आणि तांदूळ असे सुमारे 60 हजार क्विंटल धान्य नष्ट झाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी दिली.