Breaking News

दुर्गापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी मछिंद्र जाधव


राहता प्रतिनिधी ;- तालुक्यातील दुर्गापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी येथील मछिंद्र साळाजी जाधव यांची तर,व्हाईस चेअरमनपदी अलका तुळशीराम गुळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे सोसायटीच्या उपाध्यक्षपदी अलक गुळवे यांची निवड झाली. सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक राहणे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. सर्वश्री एम. एम. पुलाटे, राधाकृष्ण पुलाटे, सोपानराव पुलाटे, छगनराव पुलाटे, लक्ष्मण पुलाटे, नानासाहेब गुळवे, शहाजी मनकर, धोंडिबा पुलाटे, ज्ञानदेव पुलाटे, लक्ष्मण पुलाटे, ज्ञानेश्वर पानसरे, भाऊसाहेब जाधव, विठ्ठल पुलाटे, सुकदेव मनकर, विधीज्ञ के. जी रोकडे आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे सचिव सुनील तांबे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले.