Breaking News

प्रवरा’चे ‘जी-पीएटी’ आणि 'सी-मॅट'मध्ये सुयश


प्रवरानगर प्रतिनिधी ;- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) यावर्षी देशपातळीवर घेतलेल्या ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) आणि 'सी-मॅट'या पूर्व परीक्षेत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महिला औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले, अशी माहिती प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली. 

फार्मसी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट घेण्यात येते. या पूर्व परीक्षेमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिन्नर (चिंचोली) येथील महिला औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील जिगनिशा म्हात्रे {१६३ गुण} आणि ऐश्वर्या पाटील {१५२ गुण} मिळवून यश मिळविले. त्याचप्रमाणे 'कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट' (सी-मॅट) या परीक्षेतही या महाविद्यालयातील निलांबरी पानसरे {९७. ८} आणि आयुशी सिंग {९४. ३२} गुण मिळवून यशस्वी होण्याचा मान मिळविला.

या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हसे, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, उपप्राचार्या डॉ. भांगले आदींनी अभिनंदन केले.