Breaking News

डॉ. कापरे आणि डॉ. मो. हनिफ खान शास्त्री यांना 'संस्कृतात्मा’ पुरस्कार जाहीर


संस्कृतात्मा स्व. ओंकारनाथ मालपाणी संस्कृत संशोधन केंद्रातर्फे ओंकारनाथ मालपाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिल्या जाणारा अत्यंत मानाच्या अशा 'राष्ट्रीय संस्कृतात्मा पुरस्कार' प्रदान सोहळयाचे संगमनेर महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. संस्कृत भाषेमध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या व संस्कृत प्रसारार्थ झटणा-या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०१६-१७ चा हा पुरस्कार संगमनेर महाविद्यालयाच्या माजी संस्कृत विभाग प्रमुख डॉ. रुपाली रविंद्र कापरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यंदाचा पुरस्कार राष्ट्रीय संस्कृत संस्थान, दिल्ली येथील निवृत्त प्राध्यापक डॉ. मोहम्मद हनिफ खान शास्त्री यांना प्रदान करण्यात येणार आहे.
शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग यांच्या हस्ते उद्या {दि.२} सकाळी १० वा. महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळयासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, मालपाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त ललिता मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार वाराणसी येथील अभिराज राजेंद्र मिश्र, अहमदनगर येथील देवीप्रसाद खरवंडीकर, पुणे येथील सरोजा भाटे, छत्तीसगड येथील पुष्पा दीक्षित, पुणे येथील वसंत गाडगीळ यांना देण्यात आला होता.

संगमनेर महाविद्यालयात 'नॅक'च्या धर्तीतीवर 10 'S' ही प्रणाली राबविण्यात आली. या पुरस्कार सोहळयास उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख व संस्कृतविभाग प्रमुख डॉ. अनिरुध्द मंडलिक यांनी केले आहे.