नेवासा - तालुका प्रतिनिधी ;- तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल २ हजार ५०० रुपये जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र २ हजार १०० रुपयांवर ऊस उत्पादकांची बोळवण केली. या कारखान्याने कार्यक्षेत्रातील उभा ऊस तसाच ठेवून बाहेरुन ऊस आणण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा आन्याय सुरू आहे. या अन्यायाविरुद्ध जिल्हा दौऱ्यावर येत असलेले राज्य विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ज्ञानेश्वर सहकारी कारखान्यांवर हल्लाबोल आंदोलन करुन अडचणीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा , अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीचे निमंत्रक अशोक ताके यांनी केली आहे.
याबाबत ताके यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कारखान्यात ऊत्पादित होत असलेल्या अन्य उपपदार्थ निर्मितीतील नफा योग्य व्यवस्थापन यांची योग्य सांगङ घातल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देता येऊ शकतो मात्र. गाजावाजा करून २ हजार ५०० रुपयांची पहिली ऊचल जाहीर करून प्रत्यक्षात मात्र २ हजार १०० रुपयांवर शेतकऱ्यांची बोळवण करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची या कारखान्याने चेष्टा लावली आहे. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकर्यांत संताप व्यक्त होत आहे.
धनंजय मुंडेंनी ‘ज्ञानेश्वर’च्या आंदोलन करावे : ताके
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:45
Rating: 5