Breaking News

दत्तनगर सरपंचपदासाठी १७ अर्ज दाखल


श्रीरामपूर / तालुका प्रतिनिधी ;- तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये सरपंच आणि सदस्यपदाच्या इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्रीरामपूर तहसिल कार्यालयात उमेदवारासह कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकळे मागणी केली. त्यामुळे यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश अनारसे यांनी सांगितले आहे. सरपंचपदासाठी आतापर्यंत १७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये धनश्री सागर भोसले, जगताप सुखदेव हरिभाऊ, वाघमारे अरुण ताराचंद, जगताप संजय देविदास, गायकवाड रविंद्र नामदेव, आव्हाळ मोहन भगवान, निकम पोपट सखाराम, मगर संदीप रमेश, मगर शालिनी संदीप, पिलगर रामदास लक्ष्मण, चावरे यशोदा ईश्वरलाल, पिलगर संगीता रामदास, लोंढे अशोक मछिंद्र आदींचा समावेश आहे.