Breaking News

आनंद संगीत विद्यालयाचा शंभर टक्के निकाल


कोपरगाव /प्रतिनिधी ;- अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मिरजच्यावतीने नोव्हेंबरच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेत आनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले, अशी माहिती विद्यालयाचे संचालक आनंद आढाव यांनी दिली. प्रारंभिक व मध्यमा पूर्ण गायन, हार्मोनियम, तबला या विषयांच्या परीक्षेत कोमल हिंगमीरे, अंकिता मंडलिक, मीरा कदम, साक्षी निकुंभ, ईश्वरी बनसोडे, ऋत्तूजा नजन, उत्कर्षा थोरात, गौरी कोपटे, आरती कोरडकर, अनुराधा सोनवने, कौस्तुभ सोमासे, प्रणव सोमासे, स्नेहल पोरे, सविता वारगुळे, स्वरांजली वारगुळे, वैष्णवी पाळेकर, आचुर्यण शेणगे, कांचन चौधरी, शरद डाडर, संजय चोकणपळे या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संचालक आनंद आढाव व संगीत शिक्षिका रेखा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.