संगमनेर प्रतिनिधी - नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण समितीने सन २०१३-१४ या वर्षात केलेल्या अतुलनीय कामांबद्द्दल नगरपरिषदेला उत्कृष्ट महिला बालकल्याण समिती पुरस्कार मिळाला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन बांगर यांनी दिली. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र महापौर परिषद व नगरपरिषद महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर नगरपरिषदेला उत्कृष्ट महिला बालकल्याण समिती हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील मेयसॅ हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया राहटकर या उपस्थित होत्या. महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रेम बसंतानी, रणजित चव्हाण, नगरपरिषदेच्या विद्यमान सदस्या सोनाली शिंदे, रुपाली औटी, सुनंदा दिघे, योगिता पवार, ऋषाली भडांगे, सुहासिनी गुंजाळ, मनिषा भळगट, प्रमिला अभंग आदी उपस्थित होत्या. या पुरस्कारामुळे संगमनेर नगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
संगमनेर नगरपरिषदेला पुरस्कार प्रदान
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:29
Rating: 5