Breaking News

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात शेतकरी मेळावा


प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये दि.२८ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ‘सेंद्रिय शेती’ या विषयावर चर्चा सत्र होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक के. पी. नाना आहेर, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथील शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर आणि शिक्षक वृंद उपस्थित राहणार आहेत.