Breaking News

उक्कलगांवात दारु अड्डयांवर छापे.


श्रीरामपूर तालूक्यातील उक्कलगांव येथील अचानक दारु अड्डयावर छापे टाकण्यात आले. भिल्लहाटी, वडारवाडा शिवारात बेलापूर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत मुद्देमाल मिळून आला नाही. दि. २६ जानेवारी रोजी पार पडलेल्या उक्कलगांवच्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. उक्कलगांवच्या संरपचांसह सदस्यांनी या ठरावाची प्रत अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांना व पो.नि. संपतराव शिंदे यांना दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पो. ना. राहुल सोळुंके यांनी सांगितले. या कारवाईत पो. नि. संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर आउटपोस्टचे पोलिस नाईक अतुल लोटके, पो. ना. राहुल सोळूंके, राहुल पोकळे, अर्जुन भिंगारदे यांनी भाग घेतला.