Breaking News

डॉ अशोक तुवर अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड


सोनई /प्रतिनिधी /- कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (सोनई) येथील उप- प्राचार्य डॉ अशोक तुवर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्य पदी निवड झाली.या निवडणुकीमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून एकुण तीन उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यासाठी नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या मधून डॉ अशोक तुवर हे सर्वाधिक मतांनी निवडून आले. प्रा डॉ अशोक तुवर यांनी विविध राशीत व आंतरराष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये पेपर वाचन केलेले आहे. प्रा डॉ तुवर यांनी उत्तर कोरिया, थायलंड, नेपाळ इत्यादी देशांना भेटी दिलेल्या आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये 22 वे शोध निबंध प्रकाशित झालेले आहे. त्यांची सात क्रमिक पुस्तके व मराईन फंगाय ऑफ इंडिया हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा संदर्भ ग्रंथ प्रकाशीत झालेला आहे. डॉ तुवर यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग नक्कीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळास होईल. असे गौरव उद्गार संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी अभिनंदन करतांना व्यक्त केले.