Breaking News

निकृष्ट दर्जा सुधारून योग्य पद्धत अवलंबवावी, शिवसेनेने दिला तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा


श्रीगोंदा/प्रतिनिधी/- श्रीगोंदा नगरपालिकेच्या वतीने चालू असलेल्या रोडच्या कामाचा निकृष्ट दर्जा लवकरात लवकर सुधारून कामाची योग्य ती पद्धत अवलंबवावी. अन्यथा स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा. त्या कामात चालू असलेले गौडबंगाल तात्काळ थांबवावे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी शिवसेना शहरप्रमुख अशोक गरुडकर यांनी निवेदनातून दिला आहे. 
निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा नगरपालिकेच्या वतीने चालू असलेल्या सर्वच रस्त्यांच्या कामाचा दर्जा निकृष्ट पद्धतीचा असून रस्त्यांवरील अनेक ठिकाणी आडवे येणारे विद्युत पोल तसेच्या तसे उभा आहेत. ते बाजूला न करताही काम सुरू आहे. खडीवर रोलर न फिरवताही डांबरीकरण केले जात आहेत त्यामुळे काम चालू असताना काही ठिकाणी रस्ते खचले आहेत तर काही ठिकाणी उखडले आहेत. यात डांबराचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कमी असून हे रस्ते लवकरच उखडले जाण्याची दाट शक्यता नागरिकातून वर्तविली जात आहे. तरी या प्रकरणाची गुणनियंत्रक समिती अहमदनगर यांच्या मार्फत तपासणी करावी. तसेच प्लॅन‍ ईस्टीमेट प्रमाणे कामाची लांबी, रुंदी व गुणवत्ता राखली जावी. सखोल चौकशी होऊन निकृष्ट काम थांबवावे व संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्यात येऊ नये. अशी मागणी माजी शहरप्रमुख गारूडकर यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनाची परत मुख्याधिकारी नगरपालिका तहसील कार्यालय श्रीगोंदा यांना दिली आहे. श्रीगोंदा नगरपालिकेकङून शहराला जोङणाऱ्या सतरा रस्ताच्या कामे चालू असून प्रत्येक रस्त्यावर असणाऱ्या नागरिक व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते वांरवार रस्त्यांच्या कामाचा दर्जा निकृष्ट असले बाबत तक्रार आणि सोशल मिङीयावर निकृष्ट कामाबाबत पोष्ट व्हायरल करत असताना नगरपरीषद प्रशासन आणि पदाधिकारी दर्जा चांगला असल्याचे सांगत आहेत. याबाबत तर दि ६ रोजी नितीन रोही यांनी दोन रस्त्यांच्या मध्ये असलेल्या दुभाजकाच्या कामात १२ एम. एम. ऐवजी ८ एम. एम. जाङीचे गज वापरले आसल्याची तक्रार दि ६ रोजी केली आहे. याअगोदर अनेक मान्यवर व्यक्तीनीही रस्ताच्या कामाबाबत तक्रारी केल्या आहेत. तसेच सोशल मिङीयावर रस्त्याच्या कामामध्ये मुरूमा ऐवजी माती वापरत असल्याचे तसेच खङ्ङी , ङांबर साईङपट्याचे फोटो व्हायरल केले आहेत.