Breaking News

रुई ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी ६ तर सदस्यांसाठी ३१ उमेदवार.

शिर्डी/प्रतिनिधी राहाता तालुक्यातील रुई येथील ग्रामपंचायतीची निवडणूक १ सरपंच व १३ सदस्यांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून यासाठी ३ हजार ४९३ मतदार यासाठी मतदान करणार असून जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होत असल्याने सहाजण सरपंच पदासाठी नशीब अजमावत असून १३ जागेसाठी ३१ उमेदवार उभे असून ही निडणूक रुई पंचक्रोशीत लक्षवेधी ठरणार आहे.


जनसेवा ग्रामविकास मंडळाने ना.राधाकृष्ण विखे पा. डॉ.सुजय विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदासाठी संदीप बाबासाहेब वाबळे यांना उभे केले असून १३ जागेवर उमेदवार उभे केले आहे तर जनविकास परिवर्तन आघाडीने सरपंच पदासाठी विखे पा. परिवाराच्या मार्गदर्शनाखाली अभय विजय वाबळे यांना सरपंच पदासाठी उभे केले आहे जनसेवा ग्रामविकास मंडळाने सदस्यांसाठी अशोक कचरू कोळगे सीताराम चंद्रसेन कडू सबिना असिफ मणियार विजय निवृत्ती गायकवाड वृषाली बाळकृष्ण सुराळे योगेश आबासाहेब जपे विमल राजेंद्र राठोड मीराबाई संजय वाबळे मुनील लतिब इनामदार लता कैलास गोसावी कविता महेश जाधव ज्ञानेश्वर केशव वाबळे रीना बाबासाहेब धनवटे यांना उभे केले आहे तर जनविकास परिवर्तन आघाडीने सुचिता अभिजित देशमुख संजय दगडू पठारे रमेश पेत्रस कोळगे अभिजित वसंत चौधरी अर्चना अभय वाबळे शकुंतला सुरेश पवार वैशाली भीमराज खिलारी संजय जगन्नाथ वाबळे रोहिणी यशवंत मोरे अरुणा विजय वालझाडे सचिन नामदेव वाबळे योगेश उमाकांत वाबळे संगीता राजेंद्र कानडे हे निवडणूक लढवीत असून अपक्ष म्हणून मदिना राज महमद सय्यद संजय किसन बोंबे सुर्यकांत भाऊसाहेब वाबळे चिंतामणी काशिनाथ वाबळे मादिम बालम सय्यद हे सदस्यांसाठी निवडणूक लढवीत आहे तर सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून किरण लहानू जाधव अमोल संजय बोंबे गोविंद बाबासाहेब भडांगे छबुराव हरीभाऊ वाकचौरे हे जनतेतून सरपंच म्हणून विजयासाठी प्रयत्न करीत आहे दोन्ही गट हे विखे गटाला मानणारे आहे जनसेवा ग्रामविकास मंडळाचे नेतृत्व संदीप बाबासाहेब वाबळे भाऊराव शिरसाठ बाबासाहेब शिरसाठ हे करीत आहे तर जनविकास परिवर्तन आघाडीचे नेतृत्व बाळासाहेब वसंतराव वाबळे रावसाहेब देशमुख सचिन नामदेव वाबळे हे करीत आहे निवडणूक चांगलीच रंगात आली असून दोन्ही पॅनल विखे पा. गटाचेच असल्याने सत्ता दिली तर कुठले कामे करू असे मतदारांना पटवून सांगत आहे मात्र जनतेतून सरपंच पद असल्याने सरपंच पदाला सुद्धा मोठे महत्व आल्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरत आहे