Breaking News

श्रीगोंद्यात कृषी प्रदर्शन उदघाट्नाचा फज्जा ! खा. गांधी व पाचपुते यांच्या समोर गर्दीच नाही


श्रीगोंदा/ प्रतिनिधी/- श्रीगोंदा शहरात भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उदघाट्नचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. उदघाट्न कार्यक्रमाला खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री पाचपुते व भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड हे प्रमुख उपस्थित होते. 
श्रीगोंदा येथील श्री संत शेख महंमद महाराज यात्रेच्या निमित्ताने शहरात नगर पालिका व भाजपच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या एका उमेदवाराने भव्य असे कृषी प्रदर्शन भरविले होते. यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी खा दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. पण या उदघाट्नचा ज्याप्रकारे गाजावाजा करण्यात आला होता, त्याप्रमाणात गर्दी जमविण्यास आयोजक अपयशी झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमासाठी उपस्थितांमध्ये फक्त नगरसेवकांची गर्दी व प्रदर्शनासाठी आलेले उद्योजक यांचीच गर्दी दिसून येत होती. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.