Breaking News

भलतेच् अतिक्रमण काढून फार्स केला पूर्ण


कुकाणा /प्रतिनिधी/- कुकाणा येथील गट नं १४३ वरील अतिक्रमण सोडून भलतेच् अतिक्रमण काढून अतिक्रमने काढण्याचा फार्स पूर्ण केल्याचा आव जिल्हाधिकारी अह्मदनगर, तहसीलदार नेवासा, भूमापन नेवासा यांच्या कडून दाखवला जात आहे.

या बाबतचे सविस्तर हाती आलेले वृत्त असे आहे की, कुकाना येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गट नं १४३ क्षेत्र १०गुंठे यावर काही व्यापाऱ्यांनी २ ते ३ मजली इमारती बांधून अतिक्रमण केले आहे. या जागेवरील अतिक्रमण काढून हे क्षेत्र मोकळे करावे. यासाठी कुकाना येथील एकनाथ कचरे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर प्रकरण गेल्या ८ वर्षापासून न्यायप्रविष्ठ होते. यानंतर खंडपीठाने २ वर्षापुर्वी या जागेवरील अतिक्रमण काढून हा भूखंड रिकामा करावा. असे आदेश दिले आदेश दिल्यानंतर २ वर्ष उलटूनही कुठलीच कारवाई न केल्याने कचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर अवमान याचिका दाखल केली. अवमान याचिका दाखल झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हे अतिक्रमण काढण्याच्या हालचाली केल्या, परंतु या सर्व हालचाली संशयास्पद ठरल्या आहेत. गट नं १४३ मधील व्यापाऱ्यांना नोटीसी न देताच दुसऱ्याच् व्यापाऱ्यांना नोटीसी देण्यात आल्या. तसेच २ ते ३ मजली इमारतीचे अतिक्रमण न काढता रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या काढण्यात आल्या. तसेच गट नं १४५ मधील काही व्यापाऱ्यांच्या दुकाने देखील पाडण्यात आले.गट नं १४३ मधील अतिक्रमण जसेच्या तसे ठेवण्यात आले आहे. यावरून हे अतिक्रमण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अतिक्रमणग्रस्त क्षेत्र (गट नं १४३) १० गुंठे आहे परंतु ज्या जागेवर कारवाई करण्यात आली ते क्षेत्र १ ते २गुंठे आहे उर्वरित ८ ते ९ गुंठे क्षेत्रावरील अतिक्रमणाचे काय ? तसेच ज्या जागेवर अतिक्रमण काढण्यात आले, त्या जागेवर पुन्हा टपऱ्या उभ्या झाल्याने येथे अतिक्रमण कारवाई झाली की नाही? तसेच या टपऱ्या टाकण्यात कोणाचा आशीर्वाद आहे? याचा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. या अतिक्रमणाबाबत तहसीलदार उमेश पाटिल यांना विचारले असता, भूमापन अधिकाऱ्यांनी मोजून निशानी करुन दिल्याप्रमाणे आम्ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. यावरून संशयाची सुई मोजणी अधिकाऱ्याभोवती फिरत आहे. यावर मोजणी अधिकाऱ्यांनी मोठ्या स्वरुपात आर्थिक तडजोड केल्याची चर्चा कुकान्यात चांगली रंगली आहे. ही तडजोड ७ आकड्यात झाल्याची चर्चा जोरात सुरु आहे. गट नं १४३ सोडून चुकीच्या जगेवरील अतिक्रमण काढून गट नं १४५ मधील व्यापाऱ्यांचे नुकसान केले. तसेच जुजबी व चुकीची कारवाई करुन न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रकार जिल्हाधिकारी अहमदनगर तहसीलदार नेवासा भूमापन नेवासा यांच्याकडून झाले आहे. तडजोड करणारा मध्यस्थी व अधिकारी कोण ? हे लवकरच समजणार आहे, तोपर्यंत थांबा आणि पहा.