Breaking News

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत पी.ए. इनामदार शाळेस सुवर्ण


अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित पी.ए. इनामदार इंग्लिश मिडीयम शाळेतील विद्यार्थी अर्शान आसिफ शेख याने नुकतेच दिल्ली येथील टालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. या खेळाडूचा शाळेच्या वतीने वर्गशिक्षक संतोष जाधव व उबेद शेख यांनी सत्कार केला. यावेळी आसिफ शेख, आयेशा शेख उपस्थित होते.
नुकतीच किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ दिल्लीच्या वतीने किकबॉक्सिंग फेडरेशन कप या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 13 ते 15 वयोवर्ष व 57 किलो आतील वजनगटात अर्शान शेख याने उत्कृष्टखेळाचे प्रदर्शन करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अब्दुलरहिम खोकर, उपाध्यक्ष इंजी. इकबाल सय्यद, खजिनदार डॉ.खालिद शेख, सचिव विकार काझी, शाळेच्या संचालिका तथा मुख्यध्यापिका रोशनी डिसोझा आदिंसह शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.