साधुसंतामुळे महाराष्ट्र उभा राहिला - अनिलभैया राठोड.
कल्याण रोड येथील विद्या कॉलनी मधील श्री.विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा तिसरा वर्धापन दिनविविध धर्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी शिवसेना उपनेते अनिलभैया राठोड , महापौर सुरेखा कदम, मनपा स्थायी समिती सभापती सौ.सुवर्णाजाधव, कोतवाली पोलीस स्टेशनचे पी.आय. अभय परमार, दत्ता गाडळकर, विजय गाडळकर, प्रा.खासेराव शितोळे, शिक्षण सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष पारुनाथ ढोकळे, सचिन शिंदे, अप्पा नळकांडे, राम नळकांडे, जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे, बळवंत नागवडे, थोटे भाऊसाहेब, पंडितराव हराळ व परिसरातील भाविक व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राठोड म्हणाले शिवसेनेच्या माध्यमातून या भागात नागरिकांना सुविधा देण्याचे काम सातत्याने केले गेले आहे. १कोटी १५ लाख ची ड्रेनेज लाईन मंजुर झाली आहे. त्याचे काम लवकरच चालु होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन ढोकळे यांनी केले, तर प्रास्ताविक शितोळे सर यांनी केले. तर आभार थोटे भाऊसाहेब यांनी मानले.
