लोणी।प्रतिनिधी - येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेला दिल्ली येथील ‘सेंटर फॉर एज्युकेशन अँड रिसर्च अँड ग्लोबल फाउंडेशन’ यांचेकडून सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून राष्ट्रीय स्तरावरील " येथे शानदार समारंभात मान्यवरांकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिक्किमचे माजी गव्हर्नर बाल्मिकी प्रसाद सिंग, सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिसचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायंटिफिक हेरिटेजचे संस्थापक डॉ. एन गोपाळ कृष्णन आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक अड. अप्पासाहेब दिघे, बन्सी पाटील तांबे आणि महासंचालक डॉ. सर्जेवराव निमसे यांनी या पुरस्काराचा स्विकार केला. यावेळी दिल्ली नगर निगमच्या महापौर निमा भगत उपस्थित होत्या. पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जि. प. अध्यक्ष शालिनी विखे, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
‘प्रवरा’ला राष्ट्रीय पुरस्कार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:45
Rating: 5