स्वतःच्या स्वास्थ्याविषयक जागरूक रहा : विखे
महाराष्ट्र राज्य महिला आरोग्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, प्रवरा गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या केलेल्या 'स्त्री मुक्तीच्या जाणिवा ' आणि ‘माता महविद्यालयाच्या दारी’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी पुणे येथील मॅग्नम ओपस कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक गिरीश लाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विखे म्हणाल्या, की महिलांच्या सुरक्षेमध्ये महिलांची भूमिका ही फार महत्वाची आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलींच्या सुरक्षेविषयी सतर्क असतात. अर्थात ते असणे हे स्वाभाविकच आहे. मुलींनी स्वतः बद्दल कधी ही नकारात्मक विचार करू नये. आरोग्याची काळजी घेताना ब्लड ग्रुप, ब्लड प्रेशर, हिमोग्लोबिन यासारख्या गोष्टींकडे नेहमी लक्ष द्यायला हवे. कन्या विद्या मंदिरच्या प्राचार्या लिलावती सरोदे, श्वेता आहेर, विधिज्ञ ज्योती मालपाणी, सुरेंद्र गुजराथी आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी उपप्राचार्या डॉ. अनुश्री खैरे यांनी प्रास्तविक केले.
