Breaking News

जालिंदरनाथ बाबांच्या यात्रेनिमित्त हभप इंदोरीकर यांचे किर्तन


कोेपरगांव :  तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर परिसरातील कासली रेल्वेचौकी येथील जालिंदरनाथ बाबा देवस्थानच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दि. ७ मार्च रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत समाजप्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे किर्तन होणार आहे. यात्रेनिमीत्त दि. ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता जालिंदरनाथ बाबा देवस्थानच्यावतीने विधीवत पुजा करून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संवत्सर, लक्ष्मणवाडी, कासली रेल्वेचौकी, दशरथवाडी, दहेगांव बोलका पंचक्रोषीतील देवस्थान यात्रा पंचकमिटीने केले आहे.