राज्यात १२ वीच्या परिक्षा सुरु असतांना विनाअनुदानीत ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी केलेले आंदोलन हे शासनाच्या नाकर्त्या भूमिकेमुळे आहे. या शिक्षकांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा असून यावर शासनाने तातडीने तोडगा काढावा, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. ते म्हणाले, की राज्यात सर्वत्र विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. या शिक्षकांनी १२ वी च्या परिक्षेवर बहिष्कार टाकला आहे. शासनाने शिक्षणाचा मुलभूत हक्क कायदा केला आहे. इयत्ता १२ वी पर्यंत सर्व मुलींना मोफत शिक्षण केले आहे. मात्र सध्या राज्यातील ४० टक्के ज्युनिअर कॉलेज हे विनाअनुदानित तत्वावर आहे. या शिक्षकांना वेळोवेळी अनुदान देण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. परंतु त्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. या रास्त मागणीसंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवू.
ज्युनिअर कॉलेजच्या आंदोलनाला पाठिंबा : आ. डॉ. तांबे
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:59
Rating: 5