तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेल्या मनोली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी उज्ज्वला शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्याचे माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत दिवसेंदिवस विकासकामांकडे अग्रेसर होत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत आ. थोरात गटाने निर्विवाद विजय मिळवित ६ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी ए. जी. वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामसेवक, तलाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. यावेळी डॉ. चव्हाण, प्रभाकर बेंद्रे, काशिनाथ साबळे, उपसरपंच डॉ. भागवत साबळे, शिवाजी शिंदे, सुदर्शन गोराणे, आशा भवर, नलिनी पराड, संदीप क्षीरसागर, रमेश शिंदे, भाऊसाहेब शिंदे, संजय शिंदे, मधूकर शिंदे, सुर्यभान पायोटे आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांचे राज्याचे माजीमंत्री आ. थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, बाजीराव खेमनर, बाबा ओहोळ, सुरेश थोरात आदींनी अभिनंदन केले.
मनोलीच्या सरपंचपदी उज्ज्वला शिंदे बिनविरोध
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:23
Rating: 5