Breaking News

पुस्तकी ज्ञानाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञानदान करा :जि. प. सदस्या वराळ


अळकुटी /प्रतिनिधी /-स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक विदयार्थ्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञानदान करा. असे वक्तव्य जि. प. सदस्या पुष्पा संदीप वराळ यांनी केले. 

अळकुटी येथे जि. प. शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमासाठी अळकुटीचे सरपंच बाबाजी भंडारी ,उपसरपंच मधुकर जाधव, पारनेर तालुका जैन संघाचे अध्यक्ष कुंदनकाका साखला,पं. स. सदस्य रोहिणी काटे,गंगाराम पानमंद ,तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव घोलप,बाळासाहेब पुंडे,संजय मते,बाळासाहेब पोखर्णा ,जावेद कुरेशी,नुरेश कुरेशी,बाळकृष्ण ,शशिकांत कनिगद्वाज आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यपक पंढरीनाथ व्यवहारेंनी केले. आभारप्रदर्शन गुलाब शिरोळेंनी मांडले.