Breaking News

टोका येथे महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी


टोका /प्रतिनिधी /-नेवासा तालुक्यातील टोका येथील गोदावरी प्रवरा या पवित्र संगमावर वसलेल्या व प्रभू रामचंद्रांना सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून या निमित्ताने त्रिदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . अशी माहिती मंदिराचे प्रमुख महंत १००८ बालब्रम्हचारी महाराज यांनी दिली.महाशिवरात्री निमित्त सोमवार दि.१२ फेब्रुवारी रोजी दुधधारा सहित महारुद्र यज्ञ प्रारंभ होणार असून या दिवशी रामगड संस्थानचे हभप बाळकृष्ण महाराज दिघे यांचे सकाळी १० ते ११ वेळेच्या दरम्यान प्रवचन होणार आहे. तर मंगळवारी दि.१३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी वेदमंत्राच्या जयघोषात महंत १००८ बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक सिद्धेश्वर शिवलिंगास घालण्यात येणार असून, यानिमित्ताने पॅराशूटद्वारे मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यावेळी रामायणाचार्य हभप दुर्गा शिंदे बिडकीनकर यांचे सकाळी ८ ते ११ वाजता व दुपारी १ ते ४ यावेळेत रामायण कथा होणार आहे. हभप अशोक महाराज पांडव यांचे प्रवचनाचे देखिल आयोजन करण्यात आले आहे.