Breaking News

साखला यांची मोतीबिंदू हटाव मोहीम शिबीर जनतेसाठी लाभदायक :सरपंच भंडारी


अळकुटी /प्रतिनिधी /-सचिन सखल यांनी ग्रामीण भागामध्ये आनंदऋषीजी नेत्रालय च्या माध्यमातून जनतेसाठी मोफत शिबीराचे आयोजन करून अनेकांच्या आयुष्यात पुन्हा उजाला निर्माण केला आहे. त्यांनी घेतलेली मोतीबिंदू मोहीम जनतेसाठी खूपच लाभदायक असून त्याचा लाभ पंचक्रोशीतील जनतेने घ्यावा .असे वक्तव्य सरपंच बाबाजी भंडारी यांनी केले. 

अळकुटी येथे सचिन साखला यांच्या माध्यमातून जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी नेत्रालय व कुंदनकाका साखला मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पारनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे , पारनेर तालुका जैन संघाचे अध्यक्ष कुंदनकाका साखला बाळासाहेब पुंडे ,रांधे उपसरपंच संतोष काटे ,सामाजिक कार्यकर्ते संजय मते,भास्कर उचळे,तुळशीराम शिरोळे ,सुदाम म्हस्के ,बाळासाहेब म्हस्कुलें ,सचिन साखला,रामभाऊ मुत्याल,शरद घोलप,सुभाष पुंडे ,शिवाजी जाधव, डॉ. उत्तम थोरात, डॉ. संतोष हांडे, संजय जाधव,पांडुरंग कवडे, मधुकर झावरे, रामदास रणसिंग, जावेद कुरेशी, उत्तम घोलप, जालिंदर घोलप,पोपट भोसले ,मुन्ना पगारिया,अतुल साखला, बाळू मेहेर, किसन जाधव ,सुशील गाडेकर,विशाल बेरड आदी मान्यवर उपस्थित होते.