Breaking News

दरवर्षी मोफत जयपुर फुट प्रत्यारोपन शिबीर घेणार - डॉ. हावरे


श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने गेल्या 5 महिन्यात सेवाकार्याच्या 5 शिबीरांचे यशस्वी आयोजन संस्थानच्या वतीने करण्यात आले. श्री साईबाबा संस्थान भगवान व महावीर विकलांग सहाय्यता समिती, जयपुर यांच्या सहकार्याने मोफत कृञिम पायरोपण (जयपुर फुट) शिबीर प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीस नियमित सुरु करण्याचा निर्णय समितीच्या वतीने घेण्यात येतील अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.
श्री साईबाबा समाधी शताब्दी निमित्ताने श्री साईबाबा संस्थान, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती, जयपुर यांच्या संयुक्त विद्यमाने व लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने श्री साईनाथ रुग्णालयात आयोजित, मोफत कृञिम पायरोपण (जयपुर फुट) शिबीरामध्ये दिव्यांगांना विविध साहित्य वाटप कार्यक्रमात डॉ. हावरे बोलत होते. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्‍वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, अ‍ॅड. मोहन जयकर, बिपिन कोल्हे, डॉ. प्रताप भोसले, विश्‍वस्त तथा नगराध्यक्षा योगिता शेळके, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, विकलांग सहाय्यता समितीचे नारायण व्यास, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. एकनाथ गोंदकर, लायन्स क्लबचे सुरेश शिंदे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रदिप मुरंबीकर, डॉ. विजय नरोडे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मैथिली पितांबरे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांग रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबीरात 495 दिव्यांग रुग्णांनी आपली नाव नोंदणी केली. यापैकी 290 दिव्यांगांना पाय, 151 दिव्यांगांना काठ्या व वॉकर, 17 दिव्यांगांना व्हिलचेअर तर 17 दिव्यांगांना तीनचाकी सायकल अशा 475 दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीचे नारायण व्यास तसेच टेक्नीशियन यांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थानचे विश्‍वस्त बिपीन कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. प्रताप भोसले, शिर्डी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. एकनाथ गोंदकर आदींची भाषणे झाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मैथिली पितांबरे यांनी, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विकास शिवगजे यांनी केले.