जागतिक मराठी भाषा गौरवदिनी मराठी साहित्य प्रतिष्ठाण पुरस्कार
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मराठी भाषेचे विभागप्रमुख प्रा. रंगनाथ सुपेकर होते. यावेळी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. आय. ए. पवार, सचिव प्रा. शत्रुघ्न कदम, कार्याध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, सदस्य प्रा. कुंडल राळेभात, डॉ. जतीन काजळे, रंगनाथ राळेभात, कविता निमोणकर, प्रा. मोहन डुचे, अॅड. बाबूराव हिरडे, राजाराम सोनटक्के, प्रा. म्हस्के, प्रा. देशपांडे व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रा. मधुकर क्षीरसागर म्हणाले की, भाषा ही संस्कृतीतून व्यक्त होत असते. आज इंटरनेटच्या माध्यमातून हजारो भाषा पाहता येतात. जगण्याची इच्छा आहे त्यांनी मराठी साहित्य वाचावे असेही ते म्हणाले.
यावेळी मराठी साहित्य प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार पत्रकार अशोक निमोणकर (जामखेड), साहित्य गौरव डॉ. इंदरकुमार झांजे ( कडा ता. आष्टी), आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. मधुकर क्षीरसागर (ता. पाटोदा जि. बीड) यांना मराठी भाषा दिनानिमित्त स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, फेटा, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.