परमेश्वर प्राप्तीसाठी निष्कलंक भक्ती आवश्यक :डॉ .विकासानंद महाराज मिसाळ
पारनेर तालुक्यातील विरोली गणपती चौफुला येथील गणपती मंदिरात आयोजीत २८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे किर्तन मालेतील सातवे पुष्प गुंफताना केले. यावेळी कुंभारवाडी, पारनेर, पुणेवाडी, करंदी, कान्हुर पठार, विरोली येथील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .
डॉ मिसाळ महाराज पुढे बोलताना म्हणाले की, समाज संस्काराअभावी लयाला चालला आसुन, त्याला चांगले वळणावर आणण्यासाठी संताचे योगदान मोठे आहे. संताच्या माध्यमातुन परमेश्वरापर्यन्त पोहचता येते. मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी भक्ती आणी शक्ती एकत्र करून परमेश्वर प्राप्तीचा आनंद घ्या. आपले धर्म ग्रंथ हे प्राचिन संस्कृतीची प्रतिके आहेत. ग्रंथ श्रवणातुन निर्विकार परमात्म्याची प्राप्ती करता येते. मात्र माणुस खोटया प्रतिष्ठेपायी देव धर्म संस्कृतीची अवहेलना करू लागला. त्यासाठी मानवी जीवनाचा अर्थ समजुन घ्या. मोक्षप्राप्ती साठी संत संगती धरा संताच्या विचारानेच मानव जन्माचे कल्याण होईल.