Breaking News

शॉटसर्किट मुळे लागलेल्या आगीत 3 एकर ऊस जळून खाक


बेलपिंपळगाव/ प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील पाचेगाव हद्दीतील गट नं १७७ वरील बेलपिंपळगाव येथील शेतकरी सुभाष सरोदे व १७६ मधील संजय सरोदे यांच्या चार एकर ऊसाला मंगळवारी दुपारच्या वेळी अचानकपणे आग लागली असता मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तब्बल तिन एकर क्षेत्रातील ऊस जळाले असून एक एकर ऊस वाचवण्यात तरूणांना यश आले आहे.

दुपारच्या सुमारास बेलपिंपळगाव फाट्यानजीक असलेल्या शेतात काहीतरी जळाल्याचा वास आला व ऊस पेटला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावातून त्या ठिकाणी अनेक युवक, नागरिक हजर झाले व ही आग विझविण्यासाठी प्रयत्न करत होते. सुज्ञ नागरिकांनी अशोक सहकारी साखर कारखानाच्या अग्निशामक दलाला फोन करून ही माहिती दिली. काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घोगरे व त्यांच्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. ही आग शाॅटशर्कीट मुळे लागली अशी माहिती ऊस मालक यांनी दिली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील अनेक लोकांनी मदत केली. पण शाॅटशर्कीट मुळे लागलेल्या आगीने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजून १० ते १५ दिवसात या उसाला तोड येणार होती. 

यावेळी शाम वरघुडे ,कैलास गोर्डे ,रजनीकांत सरोदे ,राजू सरोदे, अमोल वरघुडे ,अजय खैरे ,सचिन सरोदे,किशोर बोखारे ,गणेश बोखारे,सुभाष सरोदे,रघुनाथ सरोदे,राम वरघूडे, गणेश शिंदे ,भाऊसाहेब सरोदे ,नितीन गायकवाड,संजय साठे,रोहित शिंदे,विलास पटारे, विजय गायकवाड, चंद्रकांत सरोदे,यांनी आग विझवून एक एकर ऊस वाचवण्यात अथक परिश्रम घेतले