बेलापूरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले! २ फेब्रुवारीला होणार मतदान


उक्कलगांव प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालूक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान, गेल्या पंचायत समिती निवडणुकीत अरुण नाईक विजयी झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही पोट निवडणूक होत आहे. बेलापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये ही पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात झाली असून दि. १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. दि. १५ ला माघारची मुदत आहे. येत्या दि. २५ पोटनिवडणूक होत आहेत. 
या पोटनिवडणुकीत चंद्रकात नाईक, सुधीर नवले, आ. भानुदास मुरकुटे सर्मथक असलेले शरद नवले गटाकडून अभिषेक खंडागळे, रुग्ण कल्याण समितीचे मनोज श्रीगोड, रमेश काळे यांच्या नावाची या पोटनिवडणुकीसाठी जोरदार चर्चा सुरू आहे. दत्ता कु-हे, संदीप सोनवणे, संदीप कु-हे आदींच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीमुळे बेलापूरचे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.