Breaking News

गुणवत्ता यादीत ‘संगमनेर’च्या विद्यार्थ्यांची गरुड झेप


संगमनेर / प्रतिनिधी। येथील संगमनेर महाविद्यालयाने पूर्वीपासूनच शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक कायम ठेवला आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणात्मक विकासाच्या दृष्टीने विकास व्हावा, यासाठी महाविद्यालय शिक्षणाबाबत विविध धोरण राबवित असते. परिणामी यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्याच्या एप्रिलमध्ये झालेल्या विद्यापीठ परीक्षेमध्ये महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची गायकवाड पल्लवी राजेंद्र ( टी.वाय.बी.एस्सी ) पुणे विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक पटकविला. रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थीनी पुनम रोकडे ( टी.वाय.बी.एस्सी ) व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील दिप्ती कुलकर्णी ( टी.वाय.बी.एस्सी ) या दोन्ही विद्यार्थिंनींनी विद्यापीठात तिसरा क्रमांक मिळविला. तसेच इलेक्टॉनिक्स विभागाची नम्रता ओझा ( टी.वाय.बी.एस्सी ) हीने विद्यापीठात चौथा क्रमांक मिळविला. फिजिक्स विभागातील माधुरी देशमुख व शितल सातपुते ( टी.वाय.बी.सी.) या दोघींनी नी गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक मिळविला.