Breaking News

निमगाव ग्रामपंचायतीतर्फे ४० हजारांच्या भेटवस्तू


शिर्डी/प्रतिनिधी :- निमगाव-कोऱ्हाळे येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी व मुलांना जेवण्याकरिता ४० हजार रु. किंमतीची गॅस शेगडी, कुकर, ग्लास, ताट बादली आदी साहित्य या शाळेला देण्यात आले. यावेळी सरपंच शिल्पा कातोरे, उपसरपंच अजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते कैलास कातोरे, शाळेचे मुख्याध्यापक जोशी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते सोपानराव जगताप, भानुदास कातोरे, मनोज वदक, खंडेराव कडलग, नारायण गाडेकर, सतीश डेंगळे, प्रदीप खरात, मंगेश कातोरे, रामभाऊ कातोरे, राहुल कातोरे, वाल्मिक गाडेकर, अंजनीनाथ कातोरे, नंदू कडलग आदींसह शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.