Breaking News

असहाय्य महिलेचा विनयभंग गुन्हा दाखल


शिर्डी शहर प्रतिनिधी :- पती बाहेरगावी गेल्याने घरी एकटीला भीती वाटत होती. त्यामुळे फिर्यादी महिला शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी झोपण्यास गेली. मध्यरात्रीच्या सुमारास इंदिरानगर, सावळीविहीर येथील मंगेश पाराजी मोकळ याने या महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दि. ३० जानेवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादीच्या अंगावर आरोपी मंगेश मोकळ याने हात फिरवत लज्जा उत्पन्न होईन, असे वर्तन केले. झालेला प्रकार पतीस सांगितल्यास तुझा आणि तुझ्या पतीचा खून करून टाकीन, अशी धमकी दिली. यावरून फिर्यादीने शिर्डी पोलिसात येऊन सदर आरोपीविरुद्ध देण्यात आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पो. नि. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. रावसाहेब शिंदे करत आहेत.