सोलापूर - मेंदूवरील गुंतागुंतीच्या व पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया थेट प्रक्षेपणाद्वारे उपस्थित डॉक्टरांना तज्ज्ञांकडून करून दाखवल्या. महाराष्ट्र न्यूरो सर्जरी परिषदेला सात रस्त्याजवळील बिनिट हॉस्पिटल येथे सुरुवात झाली. तीन दिवस चालणार्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी बॉम्बे हॉस्पिटलचे प्रा. डॉ. चंद्रशेखर देवपुजारी यांनी दु र्बिणीच्या सहाय्याने नाकाद्वारे मेंदूतील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटरमधून प्रक्षेपणाद्वारे करून दाखवली. तसेच एन्डोस्कोपीचे हॅन्डस ऑन मॉडेलचे प्रात्यक्षिक दाखवले. एन्डोस्कोपिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीनिवास रोहिदास यांनी पाठीच्या मणक्याचे एन्डोस्कोपीद्वारे दोन शस्त्रक्रिया दाखविल्या. यावेळी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे डॉ. देवपुजारी व डॉ. रोहिदास यांनी दिली. पुणे येथील डॉ. सुशील पाटकर यांनी मानेच्या व पाठीच्या मणक्याला इन्स्ट्रुमेंटेशन स्क्रू लावण्याविषयी माहिती दिली.
महाराष्ट्र न्यूरो सर्जरी परिषदेला सुरुवात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:30
Rating: 5