Breaking News

कारवाई की सरकारी अरेरावी मदतीचा ओघ सुरु होताच कारवाईचा फार्स

सातारा, दि.  (प्रतिनिधी) : 24 अनाथ बालकांना जिजाऊ बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून माता-पित्याचे प्रेम देणार्‍या कराड तालुक्यातील कोळे येथील दांम्पत्यावर केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाच्या पथकाने छापा टाकून वीसहून अधिक बालके ताब्यात घेतली. आश्रम चालविण्यासाठी आवश्यक शासकीय कागदपत्रांची पुर्तता केली नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ह्या संस्थेला नुकतीच माजी खासदार व सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय कृषि मंत्री खासदार शरद पवार यांनी भेट दिल्यानंतर ही कारवाई झाल्याने सेवेचे वृत घेतलेल्या दांम्पत्याला मदतीचा ओघ सुरु होताच कारवाई केल्यामुळे ही कारवाई की सरकारी अरेरावी असा भावना लोकांनी व्यक्त केल्या.


सलमा नदाफ व समीर नदाफ हे दांम्पत्य गेल्या कित्तेक दिवसापासून 20 ते 22 अनाथ मुलांचा सांभाळ करत होते. मात्र, त्यावेळी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग तसेच केंद्रिय दत्तक प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांच्या ही बाब निदर्शनास आली नाही. सध्या राज्यात युतीचे सरकार आहे. तर सातारा जिल्ह्यात सत्ताधारी सरकारच्या पक्षाचे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोकप्रतिनिधी सत्तेत आहेत. त्यामुळे ही कारवाई राजकीय आकसापोटी केली की, नदाफ दांम्पत्य करत असलेल्या सामाजिक कार्याला मिळत असलेल्या प्रसिध्दीमुळे हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. 

नदाफ यांनी 25 एप्रिल 2015 पासून तीन अनाथ मुलांना सांभाळण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्या जवळ 24 अनाथ मुले आहेत. स्वतःच्या तीन मुलांप्रमाणे ते त्यांचा सांभाळ करत आहेत. त्यापैकी अंगणवाडीत 6, पहिलीत 7, दुसरीत 3, तिसरीत 3, चौथीत 4, सातवीत 2 अशी मुले शिक्षण घेत आहेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी महिनाकाठी 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. याबाबत स्थानिक वृत्तपत्रांसह वृत्तवाहिन्यांनी नदाफ दांम्प्त्याच्यावतीने मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार सिक्किमचे राज्यपाल माजी खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त खा. शरद पवार यांच्या हस्ते व श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना उपयोगी पडणारे साहित्य भेट स्वरुपात दिले होते. 

यानंतर काही दिवसातच दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाचे पथक गुरूवारी सातारा येथे दाखल झाले होते. या पथकाने सातारा येथील महिला व बालकल्याण विभागाला सोबत घेऊन आश्रमावर छापा टाकला. यामध्ये केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाचे अधिकारी शिवानंद, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. शालिनी जगताप, जिल्हा महिला बालकल्याण विभागाचे डी. एस. तिरमते, जिल्हा परिविक्षा अधिकारी ए. बी. शिंदे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी दीप्ती कुलकर्णी यांच्या पथकाने कारवाई केली. आश्रम चालविण्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून सर्व बालकांना शासनमान्य आश्रमात हलविण्यात आली. इतक्या दिवसात या आश्रमावर क ोणत्याही अधिकार्‍यांने कारवाई केली नाही. मात्र, अनाथांच्या मदतीसाठी जगभरातून लोकांची मदत येवू लागल्यानंतर ही कारवाई झाल्याने कारवाई की सरकारी अरेरावी असा सवाल उभा राहिला आहे.