नागपूर : देशाचे ‘चौकीदार’च घोटाळेबाजांना देशाबाहेर सोडत असल्याचा आरोप ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. प्रशांत भूषण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केला. भ्रष्टाचार रोखणार्या संस्था केंद्र सरकार उदृध्वस्त करीत असल्याचेही ते म्हणाले. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे शनिवारी आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते. पंजाब नॅशनल बँकेतील एका शाखेतील व्यवस्थापक 11 हजार कोटींचे कर्ज देतो, यावर आश्चर्य व्यक्त करीत अॅड. भूषण म्हणाले, ‘कर्ज घेणारा नीरव मोदी देशाबाहेर पळाला. त्याने दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढले. रिझर्व्ह बँकेला माहिती अधिकारात कर्जबुडव्यांची माहिती मागितली असता ती अजूनही रिझर्व्ह बँकेने दिलेली नाही.
‘चौकीदार’च घोटाळेबाजांना बाहेर सोडतोय
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:13
Rating: 5