Breaking News

पेन्शनवाढीसाठी दि. २१ रोजी रामलिलावर आंदोलन


श्रीरामपूर प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनांसह अनेक संघटनांनी पेन्शनवाढीसाठी देशभर मेळावे, धरणे आंदोलन केले. दरम्यान, यासाठी दि. २१ फेब्रुवारी रोजी नवीदिल्ली येथे रामलीला मैदानावर देशव्यापी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तत्पूर्वी पेन्शनवाढ व्हावी, यासाठी केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवाल यांना खा. दिलीप गांधी आणि माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना सर्व श्रमिक संघ पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे. श्रमिक संघाचे अहमदनगर येथील पदाधिकारी गोरख कापसे, सुभाष कुलकर्णी, आनंद वायकर, रमेश गवळी, ज्ञानदेव आहेर, बाबासाहेब गाडे, बाबुराव दळवी, एस. एल. दहिफळे, भागीनाथ काळे, अशोक पवार आदी पदाधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत.