Breaking News

भालारेंच्या कसरतीचा प्रयॊगाचे कौतुक


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी :- शहरातील हिंद सेवा मंडळाच्या दादा वामन जोशी शाळेतील नंदकिशोर भालारे यांनी प्रजासत्ताकदिनी पोलीस परेड ग्राउंडवर पेटलेल्या गोल रिंगणातून विविध कसरतीचा केलेला प्रयोग अनेकांना भावला. भालारे यांनी यादरम्यान विविध देशभक्तीपर गीतनृत्य व विविध कलात्मक क्रीडा प्रात्यक्षिक सादर केले. श्रीरामपूर व नगरमध्ये विविध चित्र प्रदर्शन रांगोळी प्रदर्शन व क्रीडा प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. हिंद सेवा मंडळाच्या श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी शाळेतील या आगळ्यावेगळ्या कलाकाराची कला पाहून तहसीलदार सुभाष दळवी, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्या उपस्थितीत भालारे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शाळेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा फूट रांगोळीचित्र रेखाटले होते. या सर्वच कलाकृतींचे उपस्थितांनी कौतूक केले.