Breaking News

मूलभूत समस्यांप्रकरणी मनसेने दिला आंदोलनाचा इशारा


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी :- शहरातील आठवडे बाजारतळ, मटण मार्केटलगतच्या परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याठिकाणी स्वच्छता करण्यात यावी. कचराकुंडी, शौचालये उभारण्यात यावेत, आदी मागण्या मनसेच्यावतीने करण्यात आल्या. 
यासंदर्भात जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे, की परिसरातील नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन त्या त्वरित सोडविण्यात याव्यात. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. या परिसरात पिण्याचे पाणी सकाळी ११ ते दुपारी १२ च्या दरम्यान येते. मजुरी करणाऱ्या लोकांना पाणी भरण्यासाठी काम सोडून घरी थांबावे लागत आहे. यासाठी या परिसरात सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान पाणी सोडण्यात यावे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत कहाणे, उपशहराध्यक्ष रोहित जोंजाल, विदयार्थी सेना शहराध्यक्ष सचिन धोत्रे, सोमनाथ कुऱ्हाडे, विशाल शिंदे, विक्रम गायकवाड, पिंटू म्हस्के, रवी गायकवाड, राहुल फुलारे, गणेश गुंजाळ, मनोज गुंजाळ, सागर म्हस्के, रामदास धोत्रे, राजू शिंदे, संतोष औटी, निलेश सोनवणे, रामदास धोत्रे, सागर म्हस्के चंदन शिंदे, कैलास म्हस्के आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.